Satara Crime News : साताऱ्याच्या कराड (Karad) तालुक्यातील शिवडे गावतून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. गावच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात मागील महिन्यात 18 मार्चला सकाळी एका चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद (Satara Crime News) अवस्थेत आढळला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना काही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. सोबतच या मृतदेहाची (Crime News) ओळख पटवण्यात पोलिसांना (Satara Police) यश आले आहे. तर नराधम बापानेच चिमुकल्याचा काटा काढाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या संतापजनक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहे. मात्र जवळपास 20 दिवसांनी या चिमुकल्याच्या मृत्यूचे गुढ अखेर उकलले असून भयावह सत्य समोर आलं आहे.
Karad Crime News : कोणी नसल्याची संधी साधत थेट कृष्णा नदीत फेकून दिले
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी या चिमुकल्याचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सिद्धार्थचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याचे काही मित्र सिद्धार्थ हा तुझा मुलगा नाही, असे म्हणत चिडवत असत. सिद्धार्थ तुझ्यासारखा दिसत नाही, असे म्हणून मित्र चिडवत असल्याने मल्लिकार्जुन हा आपली पत्नी भाग्यश्री यांच्यावर संशय घेत होता. तसेच तो मागील एक ते दीड वर्षापासून पत्नीशी सातत्याने भांडत होता. मागील महिन्यात 16 मार्चला त्याने सिद्धार्थला शाळेत ॲडमिशन घेण्याचा बहाणा करत घरातून विजापूरहून साताऱ्याच्या उंब्रजमध्ये आणले आणि तेथून तो सिद्धार्थला घेऊन शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी आला होता. कोणी नसल्याची संधी साधत त्याने सिद्धार्थला थेट नदीत फेकून दिले, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विजापूर पोलिसांनी नराधम मल्लिकार्जुन आरेकरी याला ताब्यात घेतले आहे.
Karad Crime News : कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले,
सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे. मिरज लोहमार्ग पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे. कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ दरोडा पडला आहे. सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री घटना घडली आहे. सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल बंद पडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केला आहे. घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा







