दिव्य मराठी ओपिनियन: कूसच नसती, तर स्त्री जगातल्या प्रत्येक संकटातून मुक्त असती

0
15
दिव्य मराठी ओपिनियन: कूसच नसती, तर स्त्री जगातल्या प्रत्येक संकटातून मुक्त असती


विशेष संपादकीय : नवनीत गुर्जर16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

तीन महिने झाले. मणिपूर जळतेय. धावतेय. धावून-धावून मरतेय. तेथील शेतीची मालकांच्या वाटेवर नजर लागली आहे. पाळीव जनावरे खुंट्यावर अस्वस्थ आहेत. लहान मुलांचे गल्लीबोळ रक्तरंजित आहेत. शाळेला टाळे लागलेय. सर्वत्र जणू एक आग धुमसत आहे. पेटत-पसरत आहे. विझण्याचे नाव नाही आणि विझविण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरू लागलेत. त्यातच सगळ्या पुरुष समाजाला लाज वाटावी असा व्हिडिआे समोर आला. त्यात महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली जात आहे. खुलेआम अब्रू लुटली जाते.

मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये गुरुवारी महिलांची नग्न परेड केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हजारो लोकांनी काळे कपडे घातलेले लोक निदर्शने करण्यासाठी बाहेर पडले.

हे सगळे पाहून-ऐकून संताप येतो आणि लाजही वाटते. ही घटना घडली ती वेळ थोडी माती खोदून त्यात दफन करून टाकावी, असे मनात येते. मग पुन्हा वाटते जगभरातील प्रत्येक घटना, दुर्घटना, युद्ध आणि संघर्षाची झळ एकट्या महिलेने का सोसावी?

वडील, मुलगा, पती या सर्वांच्या मृत्यूनंतरही स्त्रीची हाडे आणि बांगड्या फोडल्या जातात आणि फायदा-तोट्याच्या प्रत्येक प्रसंगीही तिलाच दूषणे दिली जातात. त्यात तिचे श्रेय नसले तरीही. असे का? मग पुन्हा मनात येते. जगभरातील सगळा संघर्ष, सर्व दूषणे स्त्रीला कूस असल्यामुळेच असतील का? मेली कूस नसती तर स्त्री जगातील प्रत्येक संकटातून मुक्त असली असती. आपण पुरूषांनी नेहमीच महिलेला कधी ढाल, तर कधी तलवार बनवले.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांनी गुरुवारी इंफाळमधील घटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

वास्तविक लढावेही तिलाच लागले. तुकडेही तिचेच झाले आणि केव्हापासून तरी ती मरतही आहे. रबराच्या झाडांवर आपण तिच्यासाठी सुळावर जाण्याची व्यवस्था केली….आणि ती अनंत काळापासून कधी हसत तर कधी रडत सुळावर चढते आहे. परंतु आपण मात्र खोटेपणा सोडायला तयार नाहीत.

व्हिडिआे हा स्वत:ला लाजिरवाणे वाटावा असा आहे. तो याच दांभिकतेचे उदाहरण ठरतो. संघर्ष मैतेई व कुकींचा आहे. जमिनीचा वाद आहे. मैतेई आदिवासी गट घेऊन कुकींचा डोंगर खरेदी करू इच्छितो आणि कुकी आदिवासी जमीन सोडण्यास तयार नाहीत. जमिनीच्या वादात स्त्री का भरडली जावी? स्वत: पंतप्रधानांनी ही घटना संतापजनक आणि वेदनेने पिळवटून टाकणारी असल्याचे म्हटले आहे.

निश्चितपणे ही वेदना प्रत्येक भारतीय अनुभवत असावा. मणिपूरची ही आग कधी विझणार? देशातील प्रत्येक सकारात्मक शक्ती मिळून लवकरच मार्ग काढेल आणि तेथे शांतता नांदू लागेल, असा विश्वासही आहे. जबाबदार असलेल्या लोकांना आता जागे होऊन तोडगा काढावाच लागेल.



Source link