‘तो दिग्दर्शक म्हणून चांगला पण निर्माता म्हणून अतिशय वाईट’; पैसे बुडवल्याप्रकरणी मृणाल दुसानीस पहिल्यांदाच बोलली!

0
15
‘तो दिग्दर्शक म्हणून चांगला पण निर्माता म्हणून अतिशय वाईट’; पैसे बुडवल्याप्रकरणी मृणाल दुसानीस पहिल्यांदाच बोलली!


निर्माता म्हणून तो अतिशय वाईट!

मृणाल पुढे म्हणाली की, ‘मंदार देवस्थळी दिग्दर्शक म्हणून खूप चांगला आहे. मात्र, निर्माता म्हणून तो अतिशय वाईट आहे. ही मालिका स्वीकारण्यापूर्वी अनेकांनी मला यासंदर्भात कल्पना दिली होती. मात्र, कथानक आवडलं म्हणून मी ही मालिका करण्याचं ठरवलं होतं. शशांकला त्याचे पैसे परत मिळाले. मात्र, त्यावरचा टीडीएस अजूनही मिळालेला नाही. मला या मालिकेसाठी पैसेच मिळाले नाहीत. एकीकडे माझ्या वडिलांचं आजारपण आणि दुसरीकडे ही मालिका असं दुहेरी आव्हान त्यावेळेस पेलत होते. मात्र, माझ्या पदरी उपेक्षाच पडली.’ मालिकेच्या इतक्या वर्षानंतर मृणाल दुसनीस हिने केलेलं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.



Source link