Ramraje Naik Nimbalkar : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या कोपरा सभेत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी त्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खरं खोटं याचा तपास करतील. मात्र या प्रकरणानंतर फलटणचे नाव बदनाम झालंय. समोर महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या माहेरवरून सुद्धा फोन आले असतील कसलं हे फलटण, अशा प्रकारची विचारणा झाली असेल. मात्र अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या पेक्षा जास्त दोषी असतो. तुमच्या मागे मी आहे, घाबरू नका. याच्यापुढे कार्यकर्त्यांना आणि महिला भगिनींना त्रास झाला तर हाच रामराजे काळा कोट घालून कोर्टात तुमच्यासाठी उभा राहील, असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलंय. फलटणमधील एका भाषणात ते बोलत होते.
Ramraje Naik Nimbalkar : भाजपच्या बदनामीच मूळ कारण हे साताऱ्यात आहे – रामराजे नाईक निंबाळकर
2019 ला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजीवराजे जयकुमार गोरे, स्वतः मी आणि माजी खासदार एकत्र बसलो होतो. यामध्ये 2024 ची निवडणूक एकत्र लढायची का याबाबत चर्चा केली होती. आत्ताचे मुख्यमंत्री हे तेव्हा माझ्या बाजूने होते. त्यांनी आता क्लीन चिट दिली असेल. मात्र अजूनही ते इथं आल्यावर काय बोलायचं ते बोलतील, त्यांचा तो हक्क आहेत. भारतीय जनता पार्टीच्या बदनामीच मूळ कारण हे साताऱ्यात आहे, असा आरोप सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केलाय.
Omerga: उमरगा नगरपरिषदेच्या प्रचारात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राने वाद पेटला
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्राने उमरगा नगर परिषदेमध्ये वाद पेटला. उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीत मी हसीना पारकर असल्याचे सांगत उमेदवार मतदारांना धमकावत असल्याचे पत्र ओमराजे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. मतदार केंद्र स्थलांतरित करण्याची मागणी ही केली होती. त्यावर अभयराजे चालुक्य यांनी सांगितले की, ओबीसी गरीब महिला उमेदवाराला बदनाम करू नका? जनतेने तुम्हाला सर्वसामान्य ओबीसी महिला उमेदवारास हसीना पारकर म्हणण्यासाठी निवडून दिलेलं नाही. राक्षसी महत्वकांक्षी लोकांचं ऐकून जर एक कुटुंब उध्वस्त करत असाल तर ते धोकादायक आहे. निश्चितच त्याचे परिणाम तुम्हाला आता व भविष्यात भोगावे लागतील. असा इशारा चालुक्य यांनी दिला.
हे देखील वाचा
आणखी वाचा







