
Janmashtami 2025 Horoscope: हिंदू धर्मात जन्माष्टमीला अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र मानले जाते. हा दिवस ज्योतिषशास्त्रातही खूप खास मानला जातो. या दिवशी ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थितीत बदल होतो, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळतो. यंदा १६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य कर्क राशीत बुधाबरोबर विराजमान राहील, ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी योग निर्माण होईल. मंगळ कन्या राशीत राहून मीन राशीतील शनीबरोबर समसप्तक आणि कुंभ राशीतील राहूबरोबर षडाष्टक योग निर्माण करत आहे. ग्रहांची ही स्थिती १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.
जन्माष्टमीचा दिवस चार राशीसाठी फायदेशीर
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी जन्माष्टमीला निर्माण झालेली ग्रहांची स्थिती अत्यंत फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला पदोपदी यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील.नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)