Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रगौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिंदे गटात; ‘या’ माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार...

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिंदे गटात; ‘या’ माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश

[ad_1]

Shrikant Pangarkar enters in Shiv sena : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपी श्रीकांत पांगारकर याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री बंगळुरूमध्ये त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील यंत्रणांच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि या प्रकरणात अनेकांना अटक केली होती. पांगारकर हा २००१ ते २००६ या काळात जालना नगरपालिकेचा नगरसेवक होता. ऑगस्ट २०१८मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments