
कार्यक्रमासाठी दुबईत पोहोचला सलमान खान!
या व्हिडीओमध्ये सलमान खान कराटे कॉम्बॅटबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान सांगत आहे की, तो २० एप्रिल रोजी दुबईमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणाला की, ‘म्हणून मी सध्या दुबईत आहे आणि उद्या मी कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये भाग घेणार आहे. तुम्ही स्वतः पाहिलेल्या घटनेबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, पण मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. मी या मुलाला ओळखतो जो वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तायक्वांदो, जुजित्सू शिकत होता आणि मग कालानुरूप आमचा संपर्क तुटला होता.’ व्हिडीओमध्ये या व्यक्तीची चाहत्यांची ओळख करून देण्यापूर्वी सलमान म्हणाला की, ‘आज मला कळाले की, कराटे कॉम्बॅटचा अध्यक्ष तोच मुलगा आहे आणि त्याचे नाव असीम आहे.’