
ओह माय गॉड! प्रसिद्ध अभिनेता गोविंद नामदेव यांचे नाव ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत गेल्या काही दिवसांपासून जोडले जात आहे. शिवांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ७० वर्षीय गोविंद यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खळबळ उडवली. तिने हे फोटो शेअर करत, ‘प्रेमात वय नसतं आणि कोणतीही मर्यादा नसते’ असे दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवांगीची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यांचा फोटो पाहून अनेकजण ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले. आता या सगळ्यावर गोविंद यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.







