
या नव्या व्हिडीओमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, त्यांच्या चौकशीत मतचोरीचे पाच प्रकार समोर आले आहेत. यामध्ये डुप्लिकेट मतदार, चुकीचा पत्ता, एकाच घरात खूप जास्त मतदार, जे अशक्य आहे, मतदार यादीतील चुकीची किंवा छोटी छायाचित्रे, त्यांची ओळख पटणार नाही, फॉर्म ६ चा गैरवापर यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मतदार बनलेल्या तरुणांसाठी हा फॉर्म आहे, मात्र ९० वर्षांच्या लोकांनीही या फॉर्मचा वापर करून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत, असा दावा राहुल यांनी केला.