एका झटक्यात मुंबईच्या राजकारणाची दिशा फिरली! ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना आरक्षण जाहीर झाल्यामुळे बसणार धक्का!

0
30
एका झटक्यात मुंबईच्या राजकारणाची दिशा फिरली! ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना आरक्षण जाहीर झाल्यामुळे बसणार धक्का!


Mumbai Municipal Corporation Bmc Election 2025 Ward Reservation : मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान यानंतर आजी-माजी दिग्गज नगरसेवकांना मोठा फटका बसलाय.. पालिकेकडून काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतमध्ये
महिलांसाठी 50 टक्के म्हणजेच 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणात जागा गमावलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण जागेवरुन निवडणूक लढवावी लागणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

महायुती आणि मविआतील अनेक दिग्गज नेत्यांच्या वॉर्ड आरक्षीत असल्यामुळे मोठा धक्का बसलाय. त्यामुळे मविआ आणि महायुती या वॉर्डमध्ये कोणत्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार.  तसंच दिग्गज नेत्यांसाठी पक्ष नवीन कोणती उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत कोणत्या दिग्गज नेत्यांचे वॉर्ड आरक्षित

माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका, वार्ड क्रमांक 1 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित

किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांचा वार्ड 108 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित 

कप्तान मलिक यांचा वॉर्ड क्रमांक 170 हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक 176 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित

मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा ओबीसी वर्गासाठी राखीव

विशाखा राऊत यांचा वॉर्ड क्रमांक 191 यंदा ओबीसी महिला वर्गासाठी
राखीव

स्नेहल आंबेकर यांचा वार्ड क्रमांक 1998 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित 

माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव यांना धक्का, यशवंत जाधव यांचा वार्ड क्रमांक 209 महिला ओपनसाठी आरक्षित

ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या कोणकोणत्या माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीचा फटका 

तेजस्वी घोसाळकर -प्रभाग क्रमांक – 1
ओबीसी महिला आरक्षित

– सदा परब- प्रभाग क्रमांक – 88 
सर्वसाधारण महिला आरक्षित

– हाजी मोहम्मद हलीम खान- प्रभाग क्रमांक 96
सर्वसाधारण महिला आरक्षित

– रमेश कोरगावकर -प्रभाग क्रमांक  114
सर्वसाधारण महिला आरक्षित 

– सुरेश पाटील-  प्रभाग क्रमांक 127
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक 182
ओबीसी आरक्षित

वसंत नकाशे – प्रभाग क्रमांक 186 
एससी महिला आरक्षित

आशिष चेंबूरकर – प्रभाग क्रमांक 196 
सर्वसाधारण महिला आरक्षित 

शिवसेनेला आरक्षण सोडतीचा फटका

चंद्रवती मोरे -प्रभाग क्रमांक 121
एसटी महिला आरक्षित 

परमेश्वर कदम – प्रभाग क्रमांक 133
एससी महिला आरक्षित 

अख्तर कुरेशी – प्रभाग क्रमांक 139
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

मंगेश सातमकर- प्रभाग क्रमांक 175 
 सर्वसाधारण महिला आरक्षित

दत्ता नरवणकर – प्रभाग क्रमांक 197
सर्वसाधारण महिला आरक्षित

यशवंत जाधव -प्रभाग क्रमांक 209 
सर्वसाधारण महिला आरक्षित 

गीता सिंगण – प्रभाग क्रमांक 12 
ओबीसी महिला आरक्षित 

उपेंद्र सावंत- प्रभाग क्रमांक 118  
एससी महिला आरक्षित

संतोष खरात- प्रभाग क्रमांक 195
ओबीसी आरक्षित 

भाजपला आरक्षण सोडतीचा फटका 

मकरंद नार्वेकर  – प्रभाग क्रमांक 227 
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

रवी राजा – प्रभाग क्रमांक 176
ओबीसी महिला आरक्षित 

नील सोमय्या – प्रभाग क्रमांक 108 
ओबीसी महिला आरक्षित 

अभिजीत सामंत – प्रभाग क्रमांक 84 
 सर्वसाधारण महिला आरक्षित

अतुल शहा -प्रभाग क्रमांक 220
सर्वसाधारण महिला आरक्षित 

 ज्योती आळवणी – प्रभाग क्रमांक 85
 ओबीसी आरक्षित





Source link