
दरम्यान, इंदूर शहराचे मुख्य काझी मोहम्मद इशरत अली यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांना भेटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनुमती असलेल्या ध्वनीमर्यादेत लाउडस्पिकरचा वापर करण्याची मागणी इशरत अली यांनी केली आहे. ‘मंदिरे असोत वा मशिदी, शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळांवर ध्वनीमर्यादेच्या आत लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. लग्न समारंभ आणि इतर समारंभात मोठ्या आवाजात डीजे वाजवले जात असल्याची लोकांची तक्रार असते. अशा परिस्थितीत डीजेवर बंदी घालायला हवी. केवळ धार्मिक स्थळांवरच लाऊडस्पीकरवर निर्बंध का लादले जात आहेत?’ असा प्रश्न इशरत अली यांनी केला आहे.








