
२२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी लग्न केले!
दिलीप कुमारची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. त्यांनी आपल्या निम्म्या वयाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. १७४७मध्ये दिलीप कुमार यांचा ‘जुगनू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर दिलीप कुमार यांना पती बनवण्याचे प्रत्येक मुलीचे स्वप्न होते. त्यापैकी एक म्हणजे सायरा बानू, ज्यांना वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी दिलीप कुमारशी लग्न करायचे होते. त्यांचे स्वप्न दिलीप कुमार यांनी पूर्ण केले. दोघांचे लग्न झाले, तेव्हा सायरा बानू अवघ्या २२ वर्षांच्या होत्या, तर दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते.







