आधी प्रेमविवाह केला, मग गावातील दुसऱ्या तरुणाशी सूत जुळलं, साताऱ्यातील विवाहितेच्या मृत्यूमागचं

0
37


Satara Crime: साताऱ्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी   गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता . सोमवारी (7 जुलै ) घरी कोणी नसल्याचे पाहून तरुणाने घरात घुसत महिलेला संपवल्याचे समोर आले होते .यात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात पुण्यातून आरोपीला अटक केली होती .  अक्षय साबळे असे आरोपीचे नाव आहे .

प्रेम संबंधातून तरुणाने महिलेला संपवल्याचं प्राथमिक तपसात समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे . दरम्यान या प्रकरणात आता एक नवा खुलासा झालाय . प्रेम विवाह नंतर गावातीलच तरुणाची महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे . पूजा जाधव असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे .

आधी प्रेमविवाह केला, गावातीलच तरुणाशी सूत जुळलं अन् . .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहिता पूजा जाधव हिचा 2017 मध्ये प्रथमेश जाधव याच्याशी प्रेमविवाह झाला होता .नंतर गावातीलच तरुणाशी ठेवलेल्या अनैतिक संबंधांमधून पूजाची हत्या झाल्याचे समोर आले आहे .
 मृत विवाहिता पूजा आणि आरोपी अक्षय यांचे प्रेम प्रकरण सुरू होते . अक्षय ने तिला लग्नासाठी विचारले होते .तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारी ही त्याने दर्शवली होती .पण आधीच विवाहित असलेल्या पूजाने आरोपीस लग्न करण्यास नकार दिला .त्यामुळे दोघांमध्ये वाद होते .सात जुलै रोजी दुपारी पूजा घरी असल्याचे पाहून अक्षय तिच्या घरात घुसला व गळा चिरून त्याने पूजाला संपवले ..

घरचे शेतात, नवरा कामावर, पूजा एकटी असल्याचं लक्षात येताच…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावापासून एक-दीड किलोमीटर लांब असणाऱ्या पूजाच्या घरी दुपारी सगळे शेतात कामाला गेले होते .त्यामुळे वस्तीत कोणीही नव्हते .पूजाचा नवरा ही कामावर गेला होता .घरात कोणीच नसल्याचे पहात अक्षयने संधी साधली .अक्षय आणि पूजा यांच्यात लग्नावरून पुन्हा वाद झाला .रागाच्या भरात अक्षयने चाकूने तिचा गळा चिरला .व तो तिथून पळून गेला .गावातील लोकांनाही पूजाने अक्षयचा प्रेम संबंधाबाबत कुणकुण होती . त्यामुळे आरोपीचे नाव समजल्यावर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि तरुणाला पुण्यातून पकडले .

हेही वाचा

Satara Crime: सातारा हादरला! घरात विवाहितेचा मृतदेह सापडला, पोलिसांना प्रेमसंबंधांचा धागा सापडला, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा



Source link