[ad_1]
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखताना दिसत आहेत. २०२३ साल संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांचे नियोजन सुरू झाले आहे. नूतन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी आतूर मद्यपींसाठी सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. एरव्ही रात्री ११ वाजता बंद होणारी दारूची दुकाने २४, २५ व ३१ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याशिवाय, पब, बार अॅण्ड रेस्टोरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुली असणार आहेत.
[ad_2]
Source link
