
इंडिया आघाडीची (India alliance meeting) चौथी बैठक काल (मंगळवार) दिल्लीत पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली तर काही मुद्दे चर्चा करून तसेच तडजोडीतून सोडवण्यावर एकमत झाले. मात्र एक जेडीयू नेते असेही आहेत, ज्यांना वेगळ्याच गोष्टीचं दु:ख झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, बैठकीत समोसा दिला गेला नाही, केवळ चहा बिस्किटांवर बैठक आटोपली.






