
खिचडी प्रकरणावर गजानन कीर्तीकर काय म्हणाले?
‘हे प्रकरण करोना काळातील आहे. त्या काळात सर्व काही तात्काळ हवं होतं. जम्बो हॉस्पिटल सुरू करावं लागलं. डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ, वैद्यकीय साहित्य, बेड, बेडशीट, स्वच्छता या सगळ्या गोष्टींची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी पुष्कळ पुरवठादार पुढं आले. त्याचवेळी रुग्णांना खिचडी देण्यासाठी पुरवठादार हवा होता. आमच्या शिवसेनेचे संजय म्हशीलकर यांनी एक कंपनी स्थापन केली. सूरज चव्हाण व अमोल कीर्तीकर त्यांना मदत करत होते. ते काही भागीदार नव्हते. करोना काळात या पुरवठा साखळीत काम करणं धोकादायक होतं. पण सामाजिक भावनेतून त्यांनी काम केलं होतं. तो व्यवसाय असल्यानं म्हशीलकर यांच्या कंपनीला नफा झाला. त्यातून अमोल कीर्तीकर व सूरज चव्हाण यांना काही मानधन मिळालं. ते बँकेत आलं. इन्कम टॅक्सच्या कक्षेत आलं. त्यात कुठलंही मनी लाँड्रिंग नाही. या संदर्भातील सगळी कागदपत्रं समोर आहेत, त्याचा तपास ईडीनं केलेला आहे.





