आठ दिवसांपासून साताऱ्यातील तरुण बेपत्ता; पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; बंद खोलीतून

0
8


Pune Crime News: सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात (Pune) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प (लष्कर) परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. पीयूष ओसवाल (रा. वाई, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे ओसवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही घटना कॅम्प परिसरातील ‘मुकेश लॉज’मध्ये उघडकीस आली. बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉज प्रशासनाने तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पीयूष ओसवाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी पाहता, पीयूषने सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune Crime News: आठ दिवसांपासून बेपत्ता, वाई पोलिसांकडे तक्रार

पीयूष हा मूळचा वाई येथील रहिवासी असून, तो गेल्या आठ दिवसांपासून घरातून निघून गेला होता. घरी न परतल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्यामुळे कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. वाई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असतानाच, पुण्यात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

Pune Crime News: पोलिसांकडून तपास सुरू 

घटनास्थळाचा पंचनामा करून बंडगार्डन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पीयूष पुण्यात कधी आला, तो संबंधित लॉजवर कधीपासून वास्तव्यास होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाई पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून, दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून पुढील तपास केला जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : नवऱ्याला सोडून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची, पतीने दागिने घ्यायला नम्रता-शाहरुखला बोलावलं अन्…; घटनेनं पुण्यात खळबळ

Nagpur Accident: एकीचे 7 महिन्यांपूर्वीच लग्न, तर दुसरीच्या लग्नाची घरात लगबग, हळदी-कुंकवासाठी निघालेल्या दोघी बहिणींवर काळाची झडप, अन्…..; नागपूर हादरलं!

आणखी वाचा



Source link