अरुंधतीसोबत घडलेल्या घटनेनंतर संजना मात्र, चलबिचल झाली आहे. आता अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी राहायला येणार, ती पुन्हा सगळ्यांचा मनात घर करणार, अप्पा सगळी संपत्ती पुन्हा अरुंधतीच्या नावावर करतील असे अनेक प्रश्न तिला पडत आहेत. संजना या सगळ्यावर तोडगा कारण्यासाठी वकिलांना फोन करते. पण तेही तिला सांगतात की अप्पांच्या नावावर घर आहे. त्यामुळे ते घर कोणाला द्यायचे हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असणार आहे. तसेच अनिरुद्ध पुन्हा आता अरुंधतीकडे जाणार याची भीती संजनाच्या मनात आहे. अनिरुद्ध अरुंधतीला समजावत असतो तेव्हा संजना त्याच्याकडे रागाने पाहात असते. आता अनिरुद्ध देखील आपल्या हातातून गेल्याची भावना संजनाच्या मनात येऊ लागली आहे. त्यामुळे संजना आगामी भागात काय कटकारस्थान रचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






