Abhijeet Bhattacharya And Shah Rukh Khan : प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच, सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील ‘वो लडकी’ या लोकप्रिय ट्रॅकच्या चाहत्यांनी बनवलेल्या मॅशअपवर त्याने भडक प्रतिक्रिया दिल्याने गायक चांगलाच चर्चेत आला होता. आता नुकतेच त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून, आता हे प्रकरण मिटले असून दोघांमध्ये समेट झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील लोक शाहरुख खानला त्याच्या पाठीमागे ‘हकला’ म्हणायचे, असा खुलासाही अभिजीत भट्टाचार्य याने त्याच्या नव्या मुलाखतीत केला आहे.