Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्र‘अतिक्रमणांवरील कारवाईचा दैनंदिन अहवाल द्या’

‘अतिक्रमणांवरील कारवाईचा दैनंदिन अहवाल द्या’

‘अतिक्रमणांवरील कारवाईचा दैनंदिन अहवाल द्या’

[ad_1]

पुणे :‘शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांवर कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल अतिक्रमण विभागाने दररोज सादर करावा,’ असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणांबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

शहरातील अतिक्रमणांची संख्या वाढत असून, नागरिकांना पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर तसेच फिरती पथकेही नियुक्त केली आहेत. मात्र, तरीही अतिक्रमणे होत असल्याने चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अतिक्रमण विभागाचे प्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील सर्वच भागात अतिक्रमण विभागाने, फिरती पथके, स्थिर पथकांना नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दररोज आढावा घेतला जात आहे.- उपायुक्त संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments