
हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी दिलेल्या त्रासाला प्रतिसाद म्हणून आहू दरयाई या इराणी विद्यार्थिनीने आपले कपडे उतरवले होते. ती फक्त अंडरवेअर घालून रस्त्यावर फिरताना दिसली आणि तिचे फोटो जगभरात व्हायरल झाले. एकीकडे इराणमधील कट्टरतावाद्यांकडून आहू दरियाई हिच्या या कृत्यावर टीका केली जात आहे, तर आहू यांनी इराणी मूलतत्त्ववाद्यांना आव्हान दिले आहे, असे म्हणणारे लोक जगभरात आहेत. ही महिला स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक बनली असून तिने सांगितले की, कट्टरपंथीयांना कसे आव्हान दिले जाऊ शकते.