
जगभरातील बहुतांश देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला असून यामुळे लोकांमध्ये धास्ती आहे. भारतात केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन १ आढळल्यानंतर आता कोरोनाच्या JN.1 या व्हेरिएंटने राज्यातही शिरकाव केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेएन १ या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गातील ४१ वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. JN.1 व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे. यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत.




