सातारा : खासदार उदयनराजे यांच्या स्‍वाभिमानी शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवणार : शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

0
17


सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्यात आज (रविवार) एकूण 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. आज या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आहे. यामध्ये सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले पॅनल उभे केले आहे. याला खा. उदयनराजे यांनी पाठिंबा दर्शवत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे. त्‍यामुळे या निवडणुकीकडे जिल्‍हाच्या नजरा लागल्‍या आहेत.

हेही वाचा ; 

The post उदयनराजेंच्या स्‍वाभिमानी शेतकरी पॅनलचा धुव्वा उडवणार : शिवेंद्रराजे भोसले appeared first on पुढारी.



Source link