
BMC: शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मुंबईतील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन केले. मात्र, दुसऱ्या मार्गिकेची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आदित्य ठाकरेविरोधात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






