विराट कोहली-अनुष्का शर्मा जहीर खानसोबत डिनर पार्टीला (Video)

0
17
विराट कोहली-अनुष्का शर्मा जहीर खानसोबत डिनर पार्टीला (Video)









पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली IPL नंतर अनुष्का शर्मासोबत टाईम स्पेंड करच आहे. अद्याप तो टी 20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना झाला नाही. दरम्यान त्याने मुंबईमध्ये आपल्या मित्रांसोबत डिनर केलं. विराट कोहलीने मंगळवारी आपल्या मित्रांसोबत डिनर पार्टी केली. यावेळी अनुष्का शर्मा जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे, क्रिकेट अँकर गौरव कपूर आणि काही अन्य मित्र देखील सोबत होते. मानव मंगलानीने विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व मित्रमंडळी मुंबईतील एका रेस्टॉरेंटमधून बाहेर येताना दिसत आहेत.

अधिक वाचा-

अनुष्काची पॅपराजींना फोटो पोज देण्यासाठी टाळाटा‍ळ

डिनरनंतर कुणीच पॅपराजीसाठी पोज दिली नाही. अनुष्काने देखील पोज देण्यासाठी टाळाटाळ केली. यावेळी अनुष्का खूप कूल लूकमध्ये दिसली. अनुष्काने व्हाईट शर्टसोबत डेनिम कॅरी केलं होतं. सोबत पेन्सिल हिल्स घातली होती. अनुष्काचा हा लूक सिंपल आणि कूल होता. तर विराट कोहलीने ब्लॅक शर्टसोबत बेज कलरचा ट्राउजर घातलं होतं.

अधिक वाचा-

अनुष्का चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अनुष्का शर्मा लवकरच चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. तर विराट कोहली लवकरच जल्दी ही टी20 वर्ल्ड कप के लिए भारतीय टीम के दूसरे दस्ते के सात अमेरिका रवाना होईल.

video-manav.manglani insta वरून साभार

अधिक वाचा-

 













Source link