विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदीनेही लावली हजेरी! आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघेही भारतातून फरार

0
19
विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदीनेही लावली हजेरी! आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघेही भारतातून फरार


ललित मोदी भारतातील प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएलचे माजी चेअरमन राहिले आहेत. मोदी यांच्यावर आयपीएलमधील आर्थिक अनियमिततेचा आरोप ठेवण्यात आला आहे. ललित मोदी यांच्यावर भारतीय न्यायालयात टॅक्स फ्रॉड, मनी लाँड्रिंगसारखे खटले सुरू आहेत. याशिवाय सिद्धार्थचे वडील व भारतातील मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या विजय मल्ल्या यांच्यावर देखील बँकांकडून कर्ज घेत फसवणुक केल्याचा आरोप आहे. आयपीएल २०१० च्या हंगामानंतरच ललित मोदीला बीसीसीआयने निलंबित केले होते. त्यांच्यावर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.



Source link