राज्यात ५ तारखेपर्यंत नवे सरकार स्थापन होणार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फडणवीस आघाडीवर; भाजप नेत्याचा दावा

0
13
राज्यात ५ तारखेपर्यंत नवे सरकार स्थापन होणार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फडणवीस आघाडीवर; भाजप नेत्याचा दावा


Maharashtra Government News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुती आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, नव्या सरकार स्थापनेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर काही नेत्यांनी २ डिसेंबरची तारीख दिली. येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचेही या नेत्याने सांगितले आहे.



Source link