
मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर हायकोर्टात एक अजब प्रकरण समोर आले आहे. येथे पत्नीने मूल जन्माला घालण्यासाठी तुरुंगात कैद पतीला सोडण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तुरुंगात बंद पतीला सोडण्यासाठी महिलेने राजस्थान हायकोर्टाचा एक निकालही अर्जासोबत जोडला आहे. त्यामध्ये दावा केला आहे की, मूल जन्माला घालणे, वंश पुढे चालवणे एक मूलभूत अधिकार आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. सरकारी वकीलाकडून महिलेची मेडिकल रिपोर्ट मागितली गेली. तिच्याकडे रिपोर्ट नसल्याने न्यायालयाने आठवड्यानंतर मेडिकल रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले आहे.







