
दोन मुलांच्या आईने फेसबुक लाईव्ह करत आपल्या आयुष्याची अखेर केली. झारखंडमधील रजरप्पा येथील मां चिन्नमस्तिका मंदिराजवळ ही घटना घडली. महिलेने दामोदर नदीत उडी मारून आत्महत्या केली. यावेळी महिलेने फेसबुक पोस्ट करत आत्महत्येसाठी पती आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. ही महिला बलिडीह पोलिस ठाण्यांतर्गत कराडिया जैनामोड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचा पती देवेंद्र धर रामगड येथील वनविभागात नोकरीला असून मृत महिलेला दोन लहान मुली आहेत.








