माझ्या हिश्श्याचे किस्से: मनमोहन देसाई यांनी शॉट समजावून सांगता – सांगता स्वत:च मारली होती चिखलात उडी

0
20
माझ्या हिश्श्याचे किस्से: मनमोहन देसाई यांनी शॉट समजावून सांगता – सांगता स्वत:च मारली होती चिखलात उडी


रूमी जाफरी I बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन मनमोहन देसाईंनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज अशा चित्रपट निर्मात्याविषयी बोलणार आहे, ज्यांना तर्कापेक्षा मनोरंजनाला महत्त्व देणाऱ्या ‘मसाला सिनेमा’ किंवा ‘फॉर्म्युला सिनेमा’चे उद्गाता मानले जाते. त्यांचे नाव मनमोहन देसाई. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील चित्रपटांची नावे पाहिली तरी त्यांनी कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवले याचा अंदाज येईल.

१९६० – ७० च्या दशकात ज्यावेळी मनमोहन देसाईंनी चित्रपटनिर्मिती सुरू केली, त्यावेळच्या चित्रपटांची नावे होती – आंचल, दिल अपना प्रीत पराई, अनुराधा, बंजारन, अपना घर, बारात, आशीर्वाद, उपकार, खानदान, दिल एक मंदिर इ. इ. मनमोहन देसाईंनी आपल्या चित्रपटांची नावे ठेवली- छलिया, ब्लफ मास्टर, बदतमीज. मी त्यांच्या चित्रपटांविषयी फार बोलणार नाही, कारण त्यांचे बहुतांश चित्रपट बहुतेक लोकांनी पाहिले आहेत. त्यांचे चित्रपट पाहून अनेक वेळा प्रेक्षकांच्या मनाला आणि मेंदूला काही प्रश्न पडत. मलाही असे प्रश्न पडायचे.

तसे तर मी त्यांना अनेकदा भेटलेलो आहे. मात्र, या भेटी नमस्कार, ख्यालीखुशालीच्या फारशा पुढे गेल्या नव्हत्या. मात्र, योगायोगाने मला एकदा त्यांच्यासोबत बसून गप्पा मारण्याची, प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा ‘अनमोल’ चित्रपटाची निर्मिती सुरू होती. मनमोहनजी या चित्रपटाचे निर्माते होते आणि त्यांचा मुलगा केतन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. माझे जिवलग मित्र असलेले ऋषी कपूर या चित्रपटाचे नायक होते. एक दिवस चिंटूजी, अर्थात ऋषी कपूर म्हणाले, ‘मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, तू चेंबूरमधल्या बर्मा शेल क्लबमध्ये ये. मी तिथं अनमोलचे चित्रीकरण करतो आहे..’

मी तिथे पोहोचलो. चिंटूजींना भेटलो. केतन यांची भेट घेतली. मनमोहनजींना नमस्कार केला. त्याचदरम्यान सेटवर लंचब्रेक झाल्याने जेवण केले. त्यानंतर मनमोहनजी एकटेच बसले असल्याचे दिसले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची, त्यांना काही विचारण्याची मला संधी मिळाली. मी त्यांना विचारले, ‘अमर अकबर अँथनी’मध्ये तिन्ही मुलं एकाच वेळी आपल्या आईला रक्त देत आहेत, असं दाखवलं आहे. हे वैज्ञानिक आणि वैद्यकीयदृष्ट्याही चुकीचे आहे. त्यावर ते म्हणाले, ‘ज्या वेळी तू सिनेमा बघत होतास, तेव्हा तुला असं वाटलं का, की हे चुकीचे आहे..? मी म्हणालो, ‘नाही.’ यावर ते म्हणाले, ‘बस. ना मुलांना माहिती आहे की आपण एकमेकांचे भाऊ आहोत, ना आईला माहिती आहे की ही तिन्ही आपलीच मुले आहेत. पण, हा चित्रपट म्हणजे एक शुद्ध भारतीय भावना आहे. निसर्गाचा चमत्कार बघा की आईच्या गरजेच्या वेळी तिन्ही मुलं हॉस्पिटलमध्ये एकत्र आली आहेत आणि ते आईसाठी रक्त देत आहेत. हे पाहताना तुमच्या डोक्यात लॉजिक वगैरे येणार नाही. तुम्ही भावुक व्हाल आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. तुम्हाला हे चांगलं वाटेल. हाच मनमोहन देसाईचा सिनेमा आहे. मनमोहन देसाईच्या चित्रपटांत लोक लॉजिक नाही, तर इमोशन बघतात.’

मग मी म्हणालो, त्या ‘मर्द’मध्ये, एक जहाज चालले आहे आणि तिकडून दारासिंग घोड्यावरून येतात आणि दोरखंड फेकून ते जहाज अडवतो. नंतर तो दोरखंड एका खांबाला बांधून ठेवतो. त्यावर मनमोहनजी म्हणाले, ‘असं समज की, उद्या तुझ्या असं लक्षात आलं की, आपण सर्व काही गमावून बसलो आहोत. तुझी आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. ना खर्चायला पैसे आहेत, ना खायला. तुझ्याकडे काही दागदागिने होते, ते विकून तू आईच्या उपचारासाठी पैसे घेऊन टॅक्सीमधून निघाला आहेस. टॅक्सीतून उतरून तू चालू लागतोस. पण, पैशांची बॅग टॅक्सीतच राहिलीय आणि टॅक्सी निघून गेली, तर तू काय करशील? आरडाओरडा करशील? काय करशील? तुझ्या मनात काय विचार येईल?’ यावर मी उत्तर दिलं, अशा वेळी माझ्या मनात येईल की मी उडत जाऊन टॅक्सी पकडावी. मनमोहनजी म्हणाले, बस! मी हीच मानसिकता कॅच करतो. एक जहाज देशाची मौल्यवान संपत्ती घेऊन निघाले आहे. त्या वेळी असं वाटतं की, ते थांबवले नाही तर हे सगळं काही आपल्या देशाबाहेर जाईल. मनात येतं की काहीही करून हे जहाज थांबवलं पाहिजे. दारासिंहांनी तेच काम केलं आहे. त्या वेळी संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. अशा वेळी प्रेक्षक लॉजिक वगैरे बघत नाहीत, तर आता काय करायला पाहिजे, हेच ते पाहत असतात.

प्रश्नांची मालिका सुरू ठेवत मी त्यांना विचारलं, ‘अमर, अकबर, अँथनी’मध्ये ऋषी कपूर शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात कव्वाली गात असतात. योगायोगाने तिथे निरूपा रॉय येतात आणि त्यांना आपली गेलेली दृष्टी परत मिळते. वीस वर्षांपासून जिला काहीच दिसत नसते, तिला केवळ वीस सेकंदात दिसायला लागते. मनमोहनजींनी मला विचारले, ‘तू नास्तिक आहेस की तुझी देवावर श्रद्धा आहे?’ मी म्हणालो की, माझी ईश्वरावर श्रद्धा आहे.

मग ते म्हणाले, ‘जे लोक ईश्वर, पीर, फकीर आणि धर्मावर विश्वास ठेवतात, याचा अर्थ ते चमत्कारावरही विश्वास ठेवतात. आपल्या देशात चमत्कारांवर विश्वास ठेवणारे लोक अधिक आहेत. मीदेखील चमत्कारांवर विश्वास ठेवतो. त्यामुळं चित्रपटात निरूपा रॉय यांची दृष्टी परत येणे हा ईश्वरी चमत्कारच आहे. त्यामुळेच तो प्रसंग लोकांना आवडला आणि चित्रपट सुपरहिट झाला.

मी त्यांना आणखी काही प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी त्यांचं हेच उत्तर होतं की, मला प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करायचं आहे. नंतर ते म्हणाले की, आपण सिनेमाचं तिकीट खरेदी करतो, त्यावर लिहिलेलं असतं – इंटरटेनमेंट टॅक्स. मग लोक ज्या गोष्टीसाठी टॅक्स देत आहेत, ती गोष्ट तर त्यांना द्या. आमच्या गप्पा सुरू असताना मनमोहजींना कुणीतरी बोलावलं आणि ते काही चर्चा करण्यासाठी सेटवर गेले. मात्र, त्यांनी दिलेली उत्तरे माझ्या मनात आजही घोळत आहेत.

मनमोहनजींनी ज्या व्यावसायिक सिनेमांची सुरुवात केली, ती परंपरा डेव्हिड धवन, अनिस बज्मी, प्रियदर्शन आणि रोहित शेट्टी यांनी पुढे नेली. हे सगळे जण तोच फॉर्म्युला वापरून आजही हिंदी सिनेमाच्या तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ब्लॉकबस्टर सिनेमे देत आहेत, प्रेक्षकांना हसवत आहेत. मला या ठिकाणी प्रेम लाल शिफ़ा देहलवी यांचा एक शेर आठवतो आहे…

या तो दीवाना हंसे

या तुम जिसे तौफ़ीक़ दो

वर्ना इस दुनिया में

रह कर मुस्कुराता कौन है।

मनमोहनजींच्या निधनाची बातमी समजली त्या वेळी मी कादर खान साहेबांना विचारले. ते म्हणाले, मनमोहनजींनी आत्महत्या केल्याची बातमी खोटी असू शकते, अशी मला जराही शंका आली नाही. त्यांच्यात इतकी ऊर्जा होती आणि ते इतके उत्साहात असायचे की, ते अंथरुणावर पडून राहू शकतच नव्हते. कादरभाईंनी हेही सांगितले की, त्यांनी एकदा मनमोहनजींना विचारले होते, तुम्ही आजारी पडलात आणि अंथरुणाला खिळलात तर काय कराल? त्यावर मनमोहनजी म्हणाले होते, मी आत्महत्या करेन, पण आजारी पडून जगू शकणार नाही. जोपर्यंत जगेन, तोपर्यंत चालत-फिरत राहीन.

मला एकदा अमितजींनी (अमिताभ बच्चन) देखील मनमोहनजी किती जोशात असायचे आणि कामात किती मनापासून गुंतलेले असायचे याचा किस्सा सांगितला होता. ‘मर्द’च्या चित्रीकरणादरम्यान पुलावर शॉट लावलेला होता आणि खाली दलदल होती. त्या चिखलात उडी मारायची की नाही यावर चर्चा सुरू होती. मनमोहनजींनी हा शॉट समजावून सांगता सांगता स्वत:च त्या चिखलात उडी मारली. नंतर त्यांच्या मुलाने, केतन यांनी मला सांगितले की, मी तिथं असतो तर मी त्यांना कधीही चिखलात उडी मारू दिली नसती.

मनमोहनजींचा ‘आ गले लग जा’ हा असा चित्रपट होता, जो ‘मसाला सिनेमा’ नव्हता आणि तो फारसा चाललाही नाही. पण, तो त्यांना मनापासून खूप आवडायचा. या चित्रपटातील एक गाणे ऐका…

तेरा मुझसे है पहले का नाता कोई…

यूं ही नहीं दिल लुभाता कोई…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link