माजी सैनिकाचा दिवाळीदिवशी भजी खाण्यावरून पारा चढला, धारदार शस्त्राने नातवासमोरच सुनेला संपवले

0
16
माजी सैनिकाचा दिवाळीदिवशी भजी खाण्यावरून पारा चढला, धारदार शस्त्राने नातवासमोरच सुनेला संपवले


मुक्ती विश्वास (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून गोपाळ विश्वास (वय ७५) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ यांना भजी खाण्याची इच्छा झाली होती. त्यांची सून मुक्तीने त्यांच्यासाठी भजी बनवून त्यांना वाढली. आरोपीचा मुलगा डेबू विश्वास हा दिवाळीसाठी दुकानातून मेणबत्ती आणण्यासाठी गेला होता. घरी आल्यानंतर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने सांगितले की, आरोपी लष्करातून निवृत्त आहे. तसेच ते नेहमी रागात असतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी बाजारातून धारदार शस्त्र विकत आणले होते. याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की, नारळ सोलण्यासाठी आणले आहे. 



Source link