
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेतही ते सहभागी होतील. त्यासाठी मोदी १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ब्राझील दौऱ्यावर जाणार आहे. तेथे पंतप्रधान जी-२० परिषदेत जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि नवी दिल्ली घोषणेच्या परिणामांवर भर देतील. त्यानंतर ते आफ्रिकन देश नायजेरिया आणि दक्षिण अमेरिकी देश गयाना ला भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.