
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, २३ जूनच्या सायंकाळी अमित सैनी अल्पवयीन मुलीला घेऊन गेला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू केली. तिच्या नंबरवरती फोन केल्यानंतर कॉल अमित याने उचलला. त्याने सांगितले की, काही वेळात मुलगी घरी येईल मात्र काही वेळानंतर फोन बंद केला.