बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण! शाळा, रेल्वे स्थानक व पोलिसांवर तुफान दगडफेक; रेल रोकोवर आंदोलक ठाम

0
18
बदलापूर आंदोलनाला हिंसक वळण! शाळा, रेल्वे स्थानक व पोलिसांवर तुफान दगडफेक; रेल रोकोवर आंदोलक ठाम


Badlapur protest news : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा आज उद्रेक झाला आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर आणि बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. या  आंदोलना दरम्यान, जमावाने शाळेवर, रेल्वेस्थानकावर व पोलिसांवर दगडफेक केली आहे. तसेच रेल रोको आंदोलनावर आंदोलक ठाम आहे. यासोबतच चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील नागरिकांनी लावून धरली आहे.



Source link