Home मनोरंजन बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी

बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी

0
बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी
बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी

[ad_1]

पुणे : सुटी असल्याने पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्यांच्या घरांची पाहणी करून चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरीला गेल्याच्या घटना विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या असून, त्यामध्ये सुमारे १९ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ९८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत नेहा श्रीराम वाघ (रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, वाघ यांची आई चारधाम यात्रेला गेल्या आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून १० लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.पुणे स्टेशन भागातील आगरकरनगर परिसरात एका सदनिकेत राकेशकुमार भगवती प्रसाद (वय ३७) हे खासगी रेल्वे आरक्षण केंद्र चालवितात. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ६८ हजार रुपयांचा लॅपटाॅप आणि रोकड चोरून नेली. याबाबत प्रसाद यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत बिपीन अजयराव घाडगे (वय ४५, रा. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर तपास करत आहेत.
चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेतात.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here