प्रसाद ओकच्या नव्या चित्रपटाचा शुभारंभ होण्याआधीच शेवट? लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या वारसाने केली गर्जना!

0
17
प्रसाद ओकच्या नव्या चित्रपटाचा शुभारंभ होण्याआधीच शेवट? लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या वारसाने केली गर्जना!


Patthe Bapurao Film : सध्या मराठी मनोरंजन विश्वातही बायोपिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळू लागली आहे. गेल्या काही वर्षात अनेक बयोपिक मोठ्या पडद्यावर गाजताना दिसले. यातच आता अभिनेता प्रसाद ओक यानेही ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटाची घोषणा होताच आता एक मोठा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या कायदेशीर वारसाने पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर, त्यांच्या परवानगीशिवाय आता काहीच करता येणार नसल्याचे देखील म्हटले आहे.



Source link