
Gen Z on Fertility and Pregnancy : पिढीदरपिढी आरोग्यविषयक अनेक संकल्पनांची माहिती विविध रुपांमध्ये विविध माध्यमांतून पोहोचत गेली. जेन-झींपुढं ही माहिती अधिक व्यापक आणि प्रत्ययकारी प्रकारे पोहोचत असल्या कारणानं ही पिढी प्रजनन क्षमका, गर्भधारणा अशा आरोग्यविषयक स्थितींकडे अगदी वस्तुनिष्ठपणे पाहत असल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून यासंदर्भातील माहिती समोर आली, जिथं 23 ते 30 वयोगटातील 200 हून अधिक करुणींचा सहभाह होता. ज्यापैकी भारतातील 35 टक्क्यांहून अधिक महिलांच्या मते 35 वर्षांनंतर महिलांच्या प्रजनन क्षमतेवरव परिणाम होऊन ती कमी होते.
मदरहुड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या या सर्वेक्षणानुसार महिलांच्या मनात असणाऱ्या या निष्कर्षांमुळं नव्या पिढीतील अर्थात जेन झी तरुणी/ महिलांना आरोग्य, मुलं होण्याची वेळ आणि प्रजनन क्षमता यासंदर्भात पूर्वकल्पना असून, 41 टक्के महिलांच्या माहितीसा स्त्रोत समाज माध्यमं असल्याचं स्पष्ट होत आहे.
सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार 28-32 वयोगटातील जवळपास 40% महिला गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असून, सर्वेक्षणातील सहभागील 25 टक्के महिलांच्या मते मुल पस्तिशीच्या आत होणं योग्य. आश्चर्यकारकरित्या 35 टक्के महिलांना एएमएच (MH) अर्थात महिलांच्या प्रजनन क्षमतेसंदर्भात माहिती देणाऱ्या चाचणीची कल्पना असल्याचं तर, 10 टक्के महिलांनी ही चाचणी केल्याचंही स्पष्ट झालं. एग फ्रिजिंगची माहितीसुद्धा 56 टक्के महिलांना असून, त्याबबातच्या सखोल माहितीचा अद्यापही अभाव आहे ही मात्र वस्तूस्थिती.
तज्ज्ञ आणि वैद्यकिय क्षेत्रात, प्रामुख्यानं महिलांच्या आरोग्यविषयक विभागांमध्ये काम करणाऱ्या जाणकारांच्या मते वय आणि त्याचा प्रजनन क्षमतेशी असणारा संबंध याबाबत महिला जागरुक असून सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारतीय महिलांच्या अंडाशयांचे वय कॉकेशियन महिलांच्या तुलनेत सहा वर्षे वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुरूप प्रजननक्षमतेत घट हळूहळू होते, मात्र सर्वात लक्षणीय घट ही पस्तिशीनंतर होते.
DINKS जोडप्यांची वाढती संख्या
रिलेशनशिप अर्थात नातेसंबंधांचं स्वरुप बदलत असलानाच ‘DINKs कपल’चा ट्रेंड सध्या जोड्यांमध्ये तग धरू लागला आहे. ‘DINKs Couple’ म्हणजे Dual Income No Kids. नोकरी, व्यवसाय करणारी जोडपी लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार न करता आयुष्याचा मनसोक्त आनंद घेतात ज्यासाठी या DINK या शब्दाचा वापर केला जातो. अशा महिलांमध्ये मोडणाऱ्यांची आकडेवारी 18 टक्के इतकी आहे.
FAQ
हे सर्वेक्षण कोणत्या संस्थांनी केले आणि त्यात कोण सहभागी होते?
मदरहुड हॉस्पिटल्स आणि नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी यांनी ‘फर्टिलिटी अवेअरनेस: जेन झी इनसाइट्स’ हे सर्वेक्षण ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये केले. यात भारतातील मेट्रो आणि टियर-1 शहरांतील 23 ते 30 वयोगटातील 200 हून अधिक जेन झी महिलांचा सहभाग होता.
जेन झी महिलांना प्रजनन क्षमतेबाबत काय पूर्वकल्पना आहेत?
सर्वेक्षणानुसार, 35% हून अधिक महिलांना 35 वर्षांनंतर प्रजनन क्षमता कमी होत असल्याची कल्पना आहे. याशिवाय, 41% महिलांच्या माहितीचा मुख्य स्रोत सोशल मीडिया आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय महिलांचे अंडाशयांचे वय कॉकेशियन महिलांच्या तुलनेत 6 वर्षे लवकर वाढते, ज्यामुळे 35 नंतर प्रजनन क्षमतेत लक्षणीय घट होते.
गर्भधारणेची वेळ कधी योग्य वाटते?
25% महिलांच्या मते, मुलाची गर्भधारणा 30 वर्षांपूर्वी होणे योग्य आहे. मात्र, 28-32 वयोगटातील 40% महिला गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत किंवा योजना आखत आहेत.








