पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमधून दुर्गंध येतोय? ‘या’ सोप्या उपायाने दुर्गंध होईल दूर

0
6
पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमधून दुर्गंध येतोय? ‘या’ सोप्या उपायाने दुर्गंध होईल दूर


How To Clean Fridge: पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजला वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. या ऋतूतील आर्द्रतेमुळे फ्रिज लवकर खराब होतो, ज्यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी आणि बुरशी उद्भवते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी फ्रिज सहज स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ते सहज स्वच्छ करू शकता. यामुळे तुमचा फ्रिज स्वच्छ होईलच, शिवाय त्यातील पिवळेपणा आणि दुर्गंधीदेखील दूर होईल.

फ्रिज स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बेकिंग सोडा आणि लिंबू वापरा

फ्रिजमध्ये पिवळे डाग असणे सामान्य आहे. परंतु, कधीकधी ते इतके चिवट होतात की ते सहज निघत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू वापरू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता ते स्वच्छ कापडावर लावून पिवळ्या डागांवर घासून घ्या. त्यानंतर ते स्वच्छ कापडाने पुसून टाका; अशा प्रकारे पिवळे डाग सहज निघून जातील.

व्हिनेगरचा वापर करा

तुम्ही फ्रिज स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचादेखील वापर करू शकता. यासाठी प्रथम स्प्रे बाटलीमध्ये समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा. हे सुमारे १५ मिनिटे असेच राहू द्या. आता स्वच्छ आणि मऊ कपड्याच्या मदतीने ते पुसून टाका. अशा प्रकारे फ्रिजच्या कोपऱ्यातील आणि ट्रेमधील बुरशी निघून जाईल.

हेही वाचा

स्लायडर ट्रे उन्हात ठेवा

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा फ्रिजच्या ट्रेवरील ओलाव्यामुळे बुरशी आणि दुर्गंधी येते. अशावेळी ट्रे स्वच्छ केल्यानंतर काही वेळ उन्हामध्ये ठेवा. खरंतर हे उन्हामध्ये ठेवण्याने यातील ओलावा निघून जातो, ज्यामुळे बुरशी नाहीशी होते.





Source link