- Marathi News
- Opinion
- Loneliness Ends With Discussion, Collaboration & Solitude: Pt. Vijayashankar Mehta
16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एका छताखाली अनेक सदस्य राहत असले, तरीही त्यांपैकी काहींनाआपण एकटे आहोत, असे वाटू शकते. बाह्य जगात लोकप्रियता वप्रतिष्ठा असूनही काही लोकांना एकटेपणा जाणवतो. जे लोक सततगराड्यात असतात, त्यांनाही एकटेपणा छळतो. त्यामुळे हे समजून घेतलेपाहिजे की, एकटेपणा ही परिस्थिती नसून आजार आहे. तो दीर्घकाळटिकला, तर नैराश्य येते . म्हणूनच एकाकीपणावर वेळीच उपचार केले पाहिजेत.
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, एकटेपणा ही एक भावना आहे.तुम्ही ती जितकी जास्त अनुभवाल, तितकी ती वाढत जाईल. आणि हेदेखील निश्चित आहे की ही भावना पूर्णपणे संपणार नाही, तर याअनुभूतीचे तोंड आपल्याला अन्यत्र वळवावे लागेल. त्यासाठी आधी हेकाम करा की, इतरांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे आपण हलकेहोतो. मनावरील ओझे एकाकीपणाला खतपाणी घालत असते. दुसरेम्हणजे, लोकांना भरपूर मदत करा. सहकार्याची वृत्ती एकटेपणामध्येआनंद भरते. तिसरे काम म्हणजे, एकाकीपणाला एकांताशी जोडा.एकटेपणा आपण इतरांच्या सोबतीने मिटवतो, पण एकांतात आपणपरमात्म्याशी जोडले जातो.






