
या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसटीतून प्रवास करताना जर पत्रा सरकून मुले थेट इंजिनमध्ये जात असतील तर एसटीचा प्रवास सुरक्षित कसा असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला आहे. त्याचबरोबर नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून एसटी महामंडळचा कारभारावरही रोष व्यक्त करण्यात येत आहे.






