
Bengaluru Crime News: कर्नाटकची राजधानी आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व बंगळुरूमध्ये एका ३० वर्षीय महिलेने धावत्या ऑटोतून आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक मार्ग बदलत माहीलेला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेला असुरक्षित वाटू लागल्याने तिने ऑटो चालकाला थांबायला सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवला नाही. यामुळे तिने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली. महिलेच्या पतीने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.







