
Goods Train Derails Between Kasara And Igatpuri: कसारा आणि इगतपुरीदरम्यान मालगाडीला आज संध्याकाळी अपघात झाला. मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरुन खाली खसरल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, २० गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, पाच गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.






