कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?

0
14
कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?


झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण अप्पी आणि अर्जुन दोघेही आपल्या जीवनाचे रस्ते वेगवेगळ्या वाटेवर घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. सुजय आणि पियूमुळे सरकारांच सत्य समोर येत. सरकारांनी पैश्यांच्या लोभामुळेच अर्जुनच्या आईची ट्रीटमेंट होऊ दिली नाही. जेव्हा अर्जुनला हे कळते तेव्हा त्याला धक्का धक्का बसतो. शेवटी सरकार त्यांची चुक मान्य करतात. चिडलेला अर्जुन रागाच्या भरात विनायक, अप्पीसोबत आणि अमोलसोबत घरातून बाहेर जायचा निर्णय घेतो. तेवढ्यात सुजय अप्पीला हे सत्य माहित असल्याचे सांगतो. ते ऐकून अर्जुनला आणखी एक मोठा धक्का बसतो.



Source link