
ऑनर किलींग सारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलीस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार आहे. जोडप्यांना तिथे निवासासोबत सुरक्षा पुरवली जाणार आहे. आवश्यकतेनुसार एक वर्षापर्यंत सुरक्षागृह पुरविले जाणार आहे. ही सेवा नाममात्र शुल्क घेऊन पुरवली जाणार आहे. गृह विभागाकडून तसे जाहीर करण्यात आले आहे. जातपंचायत मुठमाती अभियानाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.




