एन. रघुरामन यांचा कॉलम: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांचा कंटाळासुद्धा साजरा करा

0
8
एन. रघुरामन यांचा कॉलम:  उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांचा कंटाळासुद्धा साजरा करा


31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

४६ वर्षीय प्रवीण पाटील सुद्धा असाच विचार करतात आणि त्यांनी या महिन्यात त्यांची मुलगी सान्वी पाटील (११) आणि अन्य एक मुलगा अर्णव भोईणकर (१२) यांच्याबाबत हा प्रयोग केला. प्रवीण यांनी विचार केला की, ‘यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद वेगळ्या पद्धतीने का घेऊ नये?’ आणि त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी सायकलवरून जाण्याचे ठरवले. त्यांचे मत आहे की, अशा प्रकारचा अनुभव मुलांना केवळ मोबाइल आणि इतर गॅजेट्सपासून दूरच ठेवणार नाही, तर त्यांच्याकडेही बालपणीच्या त्या सर्व आठवणी असतील, जशा आपल्याकडे झोके खेळतानाच्या आहेत. त्यांना दिसतंय की, आजकालची मुले कॅरम, बुद्धिबळ किंवा सापशिडीसारखे खेळही मोबाइलवर खेळतात. स्थानिक सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रवीण यांनी आपल्या मुलीला ही कल्पना सांगितली तेव्हा ती लगेच तयार झाली. अर्णवही नियमित सायकल चालवत असल्यामुळे त्यांनी अर्णवच्या पालकांना ही कल्पना सांगितली, तेव्हा तेही तयार झाले. तिघांनी २ मे रोजी मुंबईहून प्रवास सुरू केला आणि कोकणातून हळूहळू दक्षिणेकडे सरकत दररोज सुमारे १०० किमी अंतर कापून दोन आठवड्यांत कन्याकुमारीला पोहोचले.

मुले या प्रवासातून काय शिकली?

१. नियोजन करणे : त्यांनी या कडक उन्हाळ्यात उपयोगी पडू शकतील, पण वजनाने हलक्या अशा आवश्यक सर्व वस्तू सोबत घेतल्या. पाण्याची बाटली, पोषणासाठी सुकामेवा, चिक्की, स्नॅक्स इ.

२. शिस्त : वाहतूक मोठी समस्या असल्याने प्रवीण यांनी टीमसाठी एक नियम बनवला – तिघांनी एकामागे एक सायकल चालवावी आणि एकमेकांपासून जास्त अंतर नसावे, जेणेकरून मोठ्या आवाजात बोललेले ऐकू येईल. यामुळे संभाषणावर नव्हे, रस्त्यावर नेहमी लक्ष राहील.

३. वर्तमानात राहणे : त्यांनी रेस्टॉरंटची निवड काळजीपूर्वक केली, जेणेकरून वाटेत आजारी पडू नये. जेवण हलके व पौष्टिक ठेवले. केळी नेहमी हातात असत, त्यातून मुलांना निरोगी अन्न काय असते व त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, हे शिकायला मिळाले. त्यांनी कोणते अन्न शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते नाही, हेही समजून घेतले.

४. शरीराचे ऐकणे : त्यांनी वेगवेगळ्या तापमानाच्या भागातून प्रवास केला, त्यामुळे त्यांच्या शरीरानेही प्रतिक्रिया दिली. त्यांना खूप थकवा जाणवला किंवा खूप गरम वाटले, तेव्हा त्यांनी मोठा ब्रेक घेतला आणि शरीर उष्णता सहन करण्यास तयार झाले तेव्हा पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली.

५. प्रशंसा हाताळायला शिकणे : या छोट्या सायकलस्वारांबद्दल जाणून घेऊन आणि त्यांना पाहून वाटसरूही थक्क होत होते. प्रवीण यांचे मत आहे की, खरी ‘शो-स्टॉपर’ तर मुलेच होती. काहींनी त्यांना थांबवले आणि प्रश्नांची सरबत्ती केली; तर काहींनी सेल्फी काढली. एका ठिकाणी तर एका कुटुंबाने त्यांच्या नाष्ट्याचे बिल दिले, तर काहींनी त्यांच्या प्रयत्नाला सलाम केला. तामिळनाडूत एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आपल्या घरी आराम करण्यासाठीही आमंत्रित केले. ते १४ दिवसांत कन्याकुमारीला पोहोचले. सोमवारी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दोन्ही बाजूंचे मिळून सुमारे ३,३०० किमी अंतर ते पूर्ण करतील. मला खात्री आहे की, असे प्रवास मुलांसाठी सर्वात अविस्मरणीय ठरतील व परतल्यावर त्यांच्याकडे सांगायला शेकडो कथा असतील.

आजच्या काळात इंटरनेटचे व्यसन व स्क्रीन-अवलंबित्व मुलांसाठी व किशोरांसाठी मोठी चिंता असताना तज्ज्ञ सल्ला देतात की, “कंटाळाही साजरा करा!” हो. पुढच्या वेळी तुमचे मूल उन्हाळ्याच्या सुटीत कंटाळल्याची तक्रार करेल, तेव्हा तो चांगला साजरा करा आणि मुलाला म्हणा, “हे छान आहे! कंटाळा तुझ्या मनाला काही तरी सर्जनशील बनण्यासाठी प्रेरित करतो!” आपल्याला प्रत्येक गोष्ट ठरवून करण्याची गरज नाही. काहीही न करणेही चांगले आहे. नवे अनुभव हवे असतील तर पूर्णपणे अनियोजित किंवा पॅटर्न मोडून काही तरी पूर्णपणे नवीन करून बघा.

फंडा असा की, कंटाळा ही एक तात्पुरती अवस्था आहे आणि आता आपण स्क्रीनच्या पलीकडे जाऊन काही तरी नवीन अनुभव घेणार आहोत, हे त्याचे संकेत आहेत. वरच्या उदाहरणातील मुलांनी केले तसे काही तरी करायला मुलांना घेऊन जा आणि मग हे तुमच्या मुलांना कसे प्रेरणेने भरून टाकते, ते बघा.



Source link