
israel lebanon hamas war : मध्यपूर्वेतील हमास आणि हिजबुल्लाहचा खात्मा करण्याचा निर्धार केल्यानंतर इस्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. शुक्रवारी गाझा आणि लेबनॉनवर इस्रायलने एकाच वेळी भीषण हवाई हल्ले केले. दोन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या ईशान्येकडील गावांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. यात ५२ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.







