
अजमेर जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दावा केला आहे की, राजस्थानमधील अजमेर दर्गा शिवमंदिरावर बांधण्यात आला आहे. हे मंदिर भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर दर्गा समितीने परिसरात केलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.