
america returns 297 indian antiquities : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला मोठे यश मिळाले आहे. तस्करीच्या माध्यमातून देशाबाहेर नेलेल्या व भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ अनोख्या व दुर्मिळ वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. मौल्यवान आणि पुरातन वस्तूंची चोरी आणि तस्करी ही गंभीर समस्या आहे. २१०४ पासून, भारताने परदेशातून सुमारे ६४० वस्तु परत मिळवण्यात यश आले आहे.







