
अभिनेता गुरुचरण सिंह २२ एप्रिल रोजी मुंबईला जाण्यासाठी त्यांच्या घरातून निघाला होता. परंतु, तो ना मुंबईला पोहोचला, ना त्याच्या स्वतःच्या घरी परतला. गुरुचरण सिंह याच्याबद्दल त्याचे कुटुंबीय आणि चाहते खूप चिंतेत होते.’सोढी’चा कोणताही मागमूस न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनेक खुलासे केले होते,मात्र अभिनेत्याचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, या अभिनेत्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र, आता तब्बल २५ दिवसांनी तो स्वतःहून घरी परतला आहे.






