
रितेश देशमुखने देखील शेअर केला व्हिडीओ
यापूर्वी अभिनेता रितेश देशमुखने मुलांसोबत गुढी उभारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ देशमुखांची सून जिनिलियाने शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘’पहाटे लवकर उठून गुढी उभरली. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा’’ असे कॅप्शन दिले होते. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या ही व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.






